उत्पादन घटल्याने मिरचीचे दर गगनाला

Foto
कन्नड, (प्रतिनिधी): यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच अवघ्या काही आठवड्यांत लाल मिरचीचेच दर २०० ते २५० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला आहे. लागवडीतील घट आणि त्यानंतर अतिवृष्टीने केलेल्या नुकसानीचा थेट फटका उत्पादनावर बसला आहे. परिणामी यंदा मिरचीचे उत्पादन जवळपास निम्म्यावर आले असून, त्याचा परिणाम दरवाढीत स्पष्टपणे दिसून येत आहे.

यंदा मिरची लागवडीत सुमारे ४० टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. वाढते उत्पादन खर्च, मजुरीचे दर, खत-कीटकनाशकांचे वाढलेले भाव आणि मागील वर्षी अपेक्षित नफा न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी मिरचीऐवजी इतर पिकांकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लागवडीखालील क्षेत्रच कमी झाले.

या राजा समाधान महाराज लाखड, बुधवार (दि. ४) रोजी नितीन महाराज गव्हाड, गुरुवार आवाहन सप्ताह समिती व समस्त बनकिन्होळा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. मिरचीचे उत्पादन घटल्याने कडाडले दर दुहेरी संकटाचा परिणाम म्हणजे उत्पादनात झालेली मोठी घट. ज्या भागांतून मोठ्या प्रमाणावर लाल मिरचीची आवक होत असे, त्या बाजारपेठांमध्ये यंदा आवक कमी दिसून येत आहे. व्यापाऱ्यांच्या मते, सरासरी उत्पादन ५० टक्क्यांपर्यंत घटले आहे. 

आवक घटताच मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडू लागला आणि दर झपाट्याने वाढले. सध्या बाजारात लाल मिरचीचा दर २०० ते २५० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला आहे. काही दर्जेदार मिरचीला याहून अधिक भाव मिळत असल्याचेही चित्र आहे. साधारणपणे हंगामाच्या सुरुवातीला दर स्थिर राहतात किंवा हळूहळू वाढतात; मात्र यंदा सुरुवातीलाच भाव उसळल्याने पुढील काळात दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाव चांगले आहेत, पण मिरचीच नाही, अशी भावना अनेक शेतकरी व्यक्त करत आहेत. 

वाढलेले खर्च आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. बदलतो परस्थिती आणि घटलेले उत्पादन यामुळे चढ़ेच दर राहतील असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.